गुंगीचे औषध देऊन तरूणीवर बलात्कार
By Admin | Updated: September 1, 2016 21:04 IST2016-09-01T21:04:04+5:302016-09-01T21:04:04+5:30
तरूणीला घरात डांबुन ठेवुन तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर एकाने वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

गुंगीचे औषध देऊन तरूणीवर बलात्कार
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 1 - शहरातील देवपूर परिसरातील तरूणीला घरात डांबुन ठेवुन तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर एकाने वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील बोरविहीर येथे हा प्रकार घडला़ याप्रकरणी एकाविरूध्द पश्चिम देवपूर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पिडीत १९ वर्षीय तरूणीने पश्चिम देवपूर पोलीस फिर्याद दाखल केली आहे़ त्यानुसार बोरविहिर येथील समाधान युवराज पाटील याने १२ ते २७ आॅगस्ट या काळात त्याच्या स्वत:च्या घरात डांबूून ठेवले. तसेच या कालावधीत जेवणात काहीतरी गुंगीचे औषध टाकून आपण बेशुध्द असतांना वेळोवेळी बलात्कार केला़ तसेच समाधान बरोबर आपण लग्न करण्यास नकार दिल्याने त्याने हाताबुक्यांनी मारहाण केली़ व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या़
या फिर्यादीवरून समाधान पाटील याच्याविरूध्द पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३६३, ३६६, ३७६ (१), ३४४, ३२८, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा पाटील करत आहेत. ेपोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे़