जिवे मारण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार

By Admin | Updated: May 23, 2017 05:28 IST2017-05-23T05:28:22+5:302017-05-23T05:28:22+5:30

आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन तरुणीवर वेळोवेळी बलात्कार

Rape of a woman by threatening to kill him | जिवे मारण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार

जिवे मारण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवत : आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन तरुणीवर वेळोवेळी बलात्कार
केल्याप्रकरणी एका आरोपीच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
काळुराम बाळासाहेब जगताप (वय ३६, रा. वाखारी, ता. दौंड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने २७ डिसेंबर २०१६ ते २९ मार्च २०१७ दरम्यान पीडित तरुणीवर तिच्या राहत्या घरी व तिला खोटे बोलून (केडगाव, ता. दौंड) गावाच्या हद्दीत व (मोरगाव, ता. बारामती) येथील लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर विविध ठिकाणी तरुणीवर तिच्या इच्छेविरोधात बलात्कार केला.
हा प्रकार कोणाला सांगितला, तर आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी पीडित तरुणीला दिली. ही तरुणी सध्या शिक्षणानिमित्त पुणे येथे राहत असल्याने तिने आरोपीच्याविरोधात पुणे येथील विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पीडित तरुणी व आरोपी हे दोघे दौंड तालुक्यातील असल्याने हा गुन्हा यवत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विलास नाळे करीत आहेत.

Web Title: Rape of a woman by threatening to kill him