मुलाला शोधणाऱ्या महिलेवर बलात्कार

By Admin | Updated: January 24, 2017 04:04 IST2017-01-24T04:04:35+5:302017-01-24T04:04:35+5:30

घरी येण्यास उशीर झालेल्या मुलाचा शोध घेणाऱ्या महिलेवर रविवारी रात्री दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक

Rape of a woman seeking child | मुलाला शोधणाऱ्या महिलेवर बलात्कार

मुलाला शोधणाऱ्या महिलेवर बलात्कार

जळगाव : घरी येण्यास उशीर झालेल्या मुलाचा शोध घेणाऱ्या महिलेवर रविवारी रात्री दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना शहरात घडली. पोलिसांनी घटनेनंतर दोन तासांत दोघा नराधमांना ताब्यात घेतले.
शहरातील विवेकानंद नगर भागातील उद्यानात रात्री १२ वाजता ही घटना घडली. महिला व तिच्या पतीने जिल्हा पेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी रात्री दोन वाजेच्या सुमारास राहुल पारसनाथ उमाप (२३, रा. कंजरवाडा, जळगाव) व दीपक सुभाष गायकवाड (२७, रा.वरणगाव, ता.भुसावळ) यांना ताब्यात घेतले. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: Rape of a woman seeking child