आयटी कंपनीच्या कॅम्पसमध्ये महिलेवर बलात्कार
By Admin | Updated: December 30, 2015 03:41 IST2015-12-30T03:41:46+5:302015-12-30T03:41:46+5:30
हिंजवडी आयटी पार्कमधील इन्फोसिस कंपनीच्या कॅन्टीनमधील कॅशियर महिलेवर तेथीलच एका सफाई कर्मचाऱ्याने महिला स्वच्छतागृहात बलात्कार केला. तर त्याच्या साथीदाराने

आयटी कंपनीच्या कॅम्पसमध्ये महिलेवर बलात्कार
- सफाई कर्मचाऱ्याचे कृत्य
पिंपरी (पुणे) : हिंजवडी आयटी पार्कमधील इन्फोसिस कंपनीच्या कॅन्टीनमधील कॅशियर महिलेवर तेथीलच एका सफाई कर्मचाऱ्याने महिला स्वच्छतागृहात बलात्कार केला. तर त्याच्या साथीदाराने बलात्कार करतानाचे फोटो काढून महिलेला ब्लॅकमेल करत धमक्या दिल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला.
रविवारच्या घटनेप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघा सफाई कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. पोलिसांनी परितोष सुभाष बाग (२१, रा. पश्चिम बंगाल) याच्यावर बलात्काराचा तर प्रकाश किसन महाडिक (३०, हिंजवडी) याच्यावर ब्लॅकमेल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास वॉशरूममध्ये गेल्यावर सुभाष तेथे आला. वॉशरूमचा दरवाजा बंद करून त्याने अतिप्रसंग केला. मदतीसाठी ओरडत असताना कँटीनमध्ये काम करणारा प्रकाश तेथे आला. त्याने अतिप्रसंग करतानाचे फोटो मोबाइलमध्ये काढले.
इन्फोसिस कंपनीने दिलेल्या निवेदनानुसार तिघेही कंत्राटी कर्मचारी असून, कंपनी पोलिसांना तपासासाठी पूर्ण सहकार्य करत आहे. (प्रतिनिधी)