नागपूरमधील 'त्या' नराधमांनी ६ महिलांवर केला होता बलात्कार ?

By Admin | Updated: December 25, 2014 18:01 IST2014-12-25T18:01:12+5:302014-12-25T18:01:12+5:30

नागपूरमधील शिक्षिकेवरील सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी अटक झालेल्या अफरोज पठाण व त्याच्या साथीदारांनी शिक्षिकावगळता आणखी सहा महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती उघड झाली आहे.

Rape was committed by 6 women in 'Na' in Nagpur? | नागपूरमधील 'त्या' नराधमांनी ६ महिलांवर केला होता बलात्कार ?

नागपूरमधील 'त्या' नराधमांनी ६ महिलांवर केला होता बलात्कार ?

ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. २५ - नागपूरमधील शिक्षिकेवरील सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी अटक झालेल्या अफरोज पठाण व त्याच्या साथीदारांनी आणखी सहा महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती उघड झाली आहे. मात्र या महिला तक्रारीसाठी पुढे न आल्याने पोलिस या घटनेपासून अनभिज्ञ होते. 
नागपूरमधील शिक्षिकेवरील सामूहिक बलात्काराप्रकरणी २२ दिवसानंतर पोलिसांनी अफरोज पठाण (वय ३४) आणि त्याच्या चौघा नराधम साथीदारांना अटक केली आहे. या पाच जणांनी निर्जनस्थळी थांबलेल्या महिलांना लक्ष्य करत आणखी सहा महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याचे पोलिस तपासात समोर आल्याचे समजते. मात्र बलात्कार पिडीत महिलांनी भितीपोटी पोलिसांकडे तक्रारच केली नाही.
 
काय होते प्रकरण ?
अर्धवेळ शिक्षिका म्हणून काम करणारी २१ वर्षीय तरुणी १ डिसेंबररोजी तिच्या मित्रासोबत स्वामीनारायण मंदिरात गेली होती. तिथून ते दोघे दुचाकीवरुन विहीरगाव ते धारगाव या रस्त्यावर गेले आणि तिथे रस्त्याच्या कडेला गप्पा मारत बसले. या दरम्यान दोन दुचाकींवरुन अफरोज व त्याचे चौघे साथीदार तिथे आले. या पाच जणांनी पोलिस असल्याची बतावणी करत पिडीत तरुणी व तिच्या मित्राला दमदाटी केली. त्यांनी तरुणी व तिच्या मित्राला पोलिस ठाण्यात नेण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले.  तिच्या मित्राला धमकावून त्याला रस्त्यावरच सोडून दिले व पिडीत तरुणीला निर्जनस्थळी देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.  

Web Title: Rape was committed by 6 women in 'Na' in Nagpur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.