विक्रोळीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By Admin | Updated: January 15, 2015 05:19 IST2015-01-15T05:19:53+5:302015-01-15T05:19:53+5:30

विक्रोळीत एका १७ वर्षीय मुलीवर शेजारी राहणारा तरुण गेल्या तीन वर्षांपासून अत्याचार करीत असल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Rape on Vikhroli minor girl | विक्रोळीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

विक्रोळीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मुंबई: विक्रोळीत एका १७ वर्षीय मुलीवर शेजारी राहणारा तरुण गेल्या तीन वर्षांपासून अत्याचार करीत असल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी संजीव मुनीव चव्हाण (३१) या नराधमास बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करून १ फेब्रुवारीपर्यंत त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
विक्रोळी पूर्वेकडील वाल्मिकीनगर परिसरात १७ वर्षीय तक्रारदार मुलगी कुटुंबीयांसमवेत राहण्यास आहे. सातवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ही मुलगी घरीच राहत होती. त्याच परिसरात राहणाऱ्या चव्हाणने हीच संधी साधून घरात कुणीही नसताना लहान भावाला मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. मात्र भावाच्या जिवासाठी गेल्या तीन वर्षांपासून ही मुलगी अत्याचार निमूटपणे सहन करीत राहिली. मंगळवारी रात्री शौचालयासाठी बाहेर पडलेल्या या मुलीला चव्हाणने वाटेत गाठले आणि शौचालयाच्या मागच्या बाजूस नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तेथून गेलेल्या एका मुलाची नजर नराधमाच्या कृत्याकडे गेली. त्याने तत्काळ मुलीच्या आईला याबाबत माहिती दिली. आईनेही मुलीकडे धाव घेईपर्यंत मुलगी घराच्या वाटेने येताना दिसली. याप्रकरणी तिच्याकडे विचारणा केली असता, मुलीने नराधमाचे पितळ उघडे केले. स्थानिकांच्या मदतीने चव्हाणला बेदम पोलिसांच्या हाती सोपविण्यात आले.
विक्रोळी पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्याखाली चव्हाणला अटक केली. आज त्याला १ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चव्हाण हा बेरोजगार आहे. त्याचे लग्न झाले असून, त्याला ३ मुले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rape on Vikhroli minor girl