जन्मदात्याकडूनच दोन वर्षे बलात्कार

By Admin | Updated: July 14, 2014 03:31 IST2014-07-14T03:31:16+5:302014-07-14T03:31:16+5:30

ठार मारण्याची धमकी देत आपल्या १४वर्षीय मुलीवर पित्याने दोन वर्षे बलात्कार केल्याची घटना मानखुर्द येथे उघडकीस आली आहे

Rape for two years only from the biographer | जन्मदात्याकडूनच दोन वर्षे बलात्कार

जन्मदात्याकडूनच दोन वर्षे बलात्कार

मुंबई : ठार मारण्याची धमकी देत आपल्या १४वर्षीय मुलीवर पित्याने दोन वर्षे बलात्कार केल्याची घटना मानखुर्द येथे उघडकीस आली आहे. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुख्तार शेख (३८)याला आज अटक केली आहे.
मानखुर्दच्या साठेनगरात ही मुलगी सावत्र आईसोबत राहते. मुलगी ११ वर्षांची असल्यापासून आरोपी तिला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करत असे. ही बाब त्याच्या दुसऱ्या पत्नीलाही माहीत होती. तिने त्याला विरोधही केला होता. पित्याकडून होणारा हा अत्याचार सहन न झाल्याने या मुलीने सावत्र आईच्या मदतीने मानखुर्द पोलीस ठाणे गाठले. (प्रतिनिधी)

Web Title: Rape for two years only from the biographer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.