पाचगणीमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार
By Admin | Updated: March 17, 2015 17:02 IST2015-03-17T17:02:17+5:302015-03-17T17:02:42+5:30
राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतच असून पाचगणीमध्ये अवघ्या अडीच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

पाचगणीमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार
>ऑनलाइन लोकमत
पाचगणी, दि. १७ - राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतच असून पाचगणीमध्ये अवघ्या अडीच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी हा प्रकार घडला असून पोलिसांनी मुजफ्फर मुस्ताक शेख (१८) या आरोपीला अटक केली आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज शहरात बंद पुकारण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालिका काल घरासमोरील अंगणात खेळत होती, मात्र थोड्या वेळाने तिची आई अंगणात आली असता त्यांना मुलगी दिसली नाही. तिचा शोध घेतला असता आरोपी व मुलगी आरोपीच्या घरात आढळले. पीडित मुलगी वेदनेमुळे रडत होती. घडलेला प्रकार तिच्या आईच्या लक्षात आला. त्यांनी हा प्रकार कुटुंबियांना कथन केला आणि त्यांनी पोलिस स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर कलम ३७६ व अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
बलात्कार व विनयभंगाच्या घटनांमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानावर असल्याची माहिती नुकतीच समोर आली असून गेल्या वर्षांत राज्यात अत्याचाराच्या १३,८२७ तक्रारी नोंदवण्यात आल्या.