सहावर्षीय चिमुरडीवर बलात्कार
By Admin | Updated: November 3, 2014 04:32 IST2014-11-03T04:32:36+5:302014-11-03T04:32:36+5:30
कांदिवली पश्चिम येथील लालजीपाडा परिसरात एका सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्काराची घटना शनिवारी संध्याकाळी घडली.

सहावर्षीय चिमुरडीवर बलात्कार
मुंबई : कांदिवली पश्चिम येथील लालजीपाडा परिसरात एका सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्काराची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. या प्र्रकरणी २८ वर्षांच्या एका युवकाला अटक केली असून, त्याला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती कांदिवली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक महिपत पांढरमिसे यांनी दिली.
पीडित चिमुरडी काल संध्याकाळी घरी एकटी असताना तिच्याच शेजारी राहणाऱ्या आरोपीने ती एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. त्यादरम्यान तिचा भाऊ घरी आला असता, त्याने आरडाओरडा केला, त्याचवेळी तिची आईही घरी परतली.
रात्री उशिरा तिचे वडील घरी आल्यावर त्यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. आरोपीचा इमिटेशन ज्वेलरी तयार करण्याचा कारखाना आहे. पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर कांदिवली पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक
केली. (प्रतिनिधी)