शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

शाळकरी मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2016 21:22 IST

आोळखीच्या तरुणाने मैत्रिणीमार्फत घरात बोलवून एका शाळकरी मुलीवर बलात्कार केला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ही घटना घडली.

ऑनलवाइन लोकमत

नागपूर, दि. २५ : आोळखीच्या तरुणाने मैत्रिणीमार्फत घरात बोलवून एका शाळकरी मुलीवर बलात्कार केला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ही घटना घडली. मुलीला असह्य वेदना झाल्यामुळे ही संतापजनक घटना उघडकीस आली. मुलीच्या आईने मध्यरात्री तक्रार नोंदविताच पोलिसांनी आरोपी राहुल बबनराव भिवगडे (वय २२, रा. पारडी) याला अटक केली. इमामवाड्यातील शाळकरी मुलीच्या बलात्काराची घटना ताजीच असताना पुन्हा शाळकरी मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाल्याने उपराजधानीत खळबळ उडाली आहे.

पीडित मुलगी १६ वर्षांची असून, १० वीत शिकते. तिला वडील नाही. दोन मोठ्या बहिणी आणि आईसह ती भाड्याच्या घरात राहते. आई धुणीभांडी करून उदरनिर्वाह करते. पीडित मुलीच्या घरमालकासोबत आरोपी राहुल भिवगडेचे नातेसंबंध आहे. त्यामुळे तो नेहमीच तेथे येतो. त्यामुळे आरोपीची पीडित मुलीसोबत ओळख आहे. कधी कधी तो पीडित मुलीच्या घरीही येत होता. रविवारी रात्री ७.३० च्या सुमारास तो नेहमीप्रमाणे नातेवाईकाच्या घरी आला. तेरवीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने घरमालक आणि त्याचा परिवार बाहेर गेले होते. त्याने एका मैत्रिणीमार्फत निरोप देत पीडित मुलीला नातेवाईकांच्या घरी बोलवले. ती घरात आल्यानंतर दार बंद करून तिच्यावर अत्याचार केला. ही बाब कुणाला सांगितली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली.

दरम्यान, रात्री १० च्या सुमारास असह्य वेदना होत असल्यामुळे पीडित मुलगी रडू लागली. आईने विचारणा केली असता तिने तिने पोटात दुखत असल्याचे खोटेच आईला सांगितले. आईने तिला डॉक्टरकडे नेले. पोटदुखीचे औषध घेऊन ती परत आली. मात्र, तिला दुस-याच जागी वेदना होत असल्याने औषधाचा फायदा झाला नाही. रात्री ११.१५ ला ती असह्य वेदनांनी रडू लागल्यानंतर आईने तिला बघितले त्यानंतर हा गंभीर प्रकार आईच्या लक्षात आला. पीडित मुलीला घेऊन आई लगेच नंदनवन पोलीस ठाण्यात पोहचली. रात्री ११.३० ला पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. --अटक आणि पोलीस कोठडीशाळकरी मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी नंदनवन ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार सुनील महाडिक, महिला उपनिरीक्षक बावणकर यांनी आरोपीच्या घराचा पत्ता मिळवला. त्यानंतर रात्री १२.३० च्या सुमारास त्याला त्याच्या घरी झोपेतच जेरबंद करण्यात आले. त्याला सोमवारी कोर्टात हजर करून त्याचा २७ जुलैपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला. आरोपी राहूल सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानात नोकर असून, त्याच्यावर यापूर्वी कुठे काही गुन्हे दाखल आहेत काय, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.