अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार, 2 महिन्यानंतर घटना उघडकीस
By Admin | Updated: September 18, 2016 22:18 IST2016-09-18T22:18:41+5:302016-09-18T22:18:41+5:30
सातवीत शिकणा-या मुलीशी मैत्री करून एका ३० वर्षाच्या आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना

अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार, 2 महिन्यानंतर घटना उघडकीस
>नरेश डोंगरे/ऑनलाइन लोकमत
नागपूर,दि.18- राज्यातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. सातवीत शिकणा-या मुलीशी मैत्री करून एका 30 वर्षाच्या आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. दोन महिन्यांपूर्वी घडलेली ही घटना आता उघडकीस आली आहे.
आरोपी मंगेश गोपीचंद निनावे (वय 30) आणि पीडित मुलगी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच मोहल्ल्यात राहतात. मुलगी (वय 12) सातवीची विद्यार्थिनी आहे. आरोपी निनावे कपडे विकण्याचा धंदा करतो. मुलीसोबत त्याची ओळखी अन् बातचित होती. ते एकमेकांशी मोबाईलवर बोलत होते. अंदाजे दोन महिन्यांपूर्वी पहाटे 3 ते 5 या वेळेत त्याने मुलीच्या मोबाईलवर फोन करून तिला बाहेर बोलविले. त्यानंतर तिला बाजूच्या जिन्यावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
या प्रकाराची कुणकुण लागल्यानंतर पालकांनी कोतवाली ठाण्यात शनिवारी तक्रार नोंदवली. महिला पोलीस उपनिरीक्षक हरडे यांनी आरोपी निनावे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.