मामाचा भाचीवर बलात्कार

By Admin | Updated: March 7, 2015 01:18 IST2015-03-07T01:18:01+5:302015-03-07T01:18:01+5:30

देवगड तालुक्यातील कातवण गावातील मामानेच अल्पवयीन भाचीवर बलात्कार केला आहे. देवगड पोलिसांनी याप्रकरणी संशयिताला अटक केली आहे.

Rape of maternal grandmother | मामाचा भाचीवर बलात्कार

मामाचा भाचीवर बलात्कार

पुरळ : देवगड तालुक्यातील कातवण गावातील मामानेच अल्पवयीन भाचीवर बलात्कार केला आहे. देवगड पोलिसांनी याप्रकरणी संशयिताला अटक केली आहे.
देवगड तालुक्यातील कातवण येथील पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या मामाकडे आजोळी ९ सप्टेंबर ते २७ जानेवारी २०१५ दरम्यानच्या कालावधीत राहण्यासाठी आली होती. मामाकडे राहत असतानाच या पीडित मुलीच्या मामाने तिच्यावर वारंवार जबरी बलात्कार केला. तसेच ही गोष्ट घरात कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
आजोळी राहिल्यानंतर ही मुलगी जानेवारी २०१५ अखेर आपल्या राहत्या ठिकाणी आई-वडिलांकडे मुंबई येथे गेली होती. ती मुंबईत गेल्यावर अचानक आजारी पडल्यामुळे तत्काळ आई-वडिलांनी दवाखान्यात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले.
मुलीने आई-वडिलांना आपल्या मामानेच आजोळी असताना वारंवार बलात्कार केल्याचे सांगितले. या घटनेने सुन्न झालेल्या त्या मुलीच्या आई-वडिलांनी मुंबई येथील टिळकनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. ही घटना देवगड तालुक्यात घडल्यामुळे टिळकनगर पोलिसांनी देवगड पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार पाठविली. यावरून देवगड पोलिसांनी मुलीच्या मामाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार
तळेगाव दाभाडे : सात वर्षांच्या चिमुरडीवर लोणावळ्यात झालेल्या अत्याचार व निर्घृण खुनाची घटना ताजी असतानाच तळेगाव दाभाडेजवळील इंदोरी (ता. मावळ) येथील एका वस्तीवर बुधवारी (४ मार्च ) पाच वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात केलेल्या कारवाईत २४ तासांच्या आत फरारी नराधामास गजाआड केले. उमेश शिवाजी ठाकर (२०) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

Web Title: Rape of maternal grandmother