पत्नीच्या इच्छेविरुद्ध सेक्स करणा-या पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा

By Admin | Updated: July 8, 2016 15:47 IST2016-07-08T15:47:03+5:302016-07-08T15:47:03+5:30

पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर शरीरसंबंधांची जबरदस्ती केली म्हणून वर्सोवा पोलिसांनी पती विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Rape of a husband against his wife's wish | पत्नीच्या इच्छेविरुद्ध सेक्स करणा-या पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा

पत्नीच्या इच्छेविरुद्ध सेक्स करणा-या पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ८ - पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर शरीरसंबंधांची जबरदस्ती केली म्हणून वर्सोवा पोलिसांनी पती विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी एका चित्रपट निर्मात्याचा पुतण्या आहे. आरोपीवर प्रोडक्शन हाऊसची जबाबदारी आहे. पिडित महिलेने स्वत: पोलिसांशी संपर्क साधून पतीवर छळाचा आणि बलात्काराचा आरोप केला. 
 
पती आपले सगळे दागिने घेऊन गेला व परत द्यायला नकार दिला. आपणे जेव्हा दागिने मागितले तेव्हा त्याने मारहाण केली व आपल्या इच्छेविरुद्ध जबदरस्तीने संभोग केला असे पिडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. वर्सोवा पोलिस ठाण्यात यासंबंधी चार दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. 
 
पत्नीच्या जबानीवरुन आम्ही प्राथमिक तक्रार दाखल केली असून, आरोपांची पडताळणी करत आहोत. अटक करण्याआधी प्राथमिक चौकशी केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. कलम ३७६ (बलात्कार), ४९८ (३) (पत्नीशी क्रौर्याने वागणे) या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
 

Web Title: Rape of a husband against his wife's wish