ग्रामसेवकाकडून ग्रामसेविकेवर बलात्कार

By Admin | Updated: January 8, 2017 23:34 IST2017-01-08T23:34:18+5:302017-01-08T23:34:18+5:30

शासकीय कामात अडचण आणेल अशी धमकी देऊन, चोपडा तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षाने ग्रामसेविकेवरच वेळोवेळी बलात्कार केला.

Rape of Gramsevak by Gramsevak | ग्रामसेवकाकडून ग्रामसेविकेवर बलात्कार

ग्रामसेवकाकडून ग्रामसेविकेवर बलात्कार

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 8  : शासकीय कामात अडचण आणेल अशी धमकी देऊन, चोपडा तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षाने ग्रामसेविकेवरच वेळोवेळी बलात्कार केला. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील एका ग्रामसेवक महिलेवर चंद्रशेखर निंबाजी सोनवणे यांने तुला शासकीय कामात अडचण आणेल अशा धमकी देऊन, ती घरात एकटी असतांना, तिच्यावर अत्याचार केला. ही घटना जानेवारी व फेब्रुवारी २०१६ (तारीख माहित नाही) तेसच २७ व २९ डिसेबंर २०१६ रोजी घडली.

पिडीत ग्रामसेविकेने आज चोपडा शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सी.एन.सोनवणे यांच्याविरूद्ध भादवि ३७६ (१),(एन),४५२,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार झालेला आहे. तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहे.

Web Title: Rape of Gramsevak by Gramsevak