बालिकेवर बलात्कार;गळ्यावर शस्त्रने वार

By Admin | Updated: October 17, 2014 02:14 IST2014-10-17T02:14:41+5:302014-10-17T02:14:41+5:30

शिरपूरमध्ये आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिच्या गळ्यावर धारदार शस्त्रने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आह़े

Rape of the girl; Arrest warms on the neck | बालिकेवर बलात्कार;गळ्यावर शस्त्रने वार

बालिकेवर बलात्कार;गळ्यावर शस्त्रने वार

धुळे : शिरपूरमध्ये आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिच्या गळ्यावर धारदार शस्त्रने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आह़े 
मुलीची प्रकृती गंभीर असून तिला धुळ्य़ातील जिल्हा रूग्णालयात दाखल केले आह़े अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शिरपूरमधील प्रेमनगरातील बांधकाम सुरू असलेल्या घराच्या खोलीत आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कॉलनीतीलच एकाने बलात्कार केला़ तसेच तिच्या गळ्यावर धारदार शस्त्रने वार केल्याने त्यात ती गंभीर जखमी झाली़ बुधवारी दुपारी ही घटना घडली़ मुलीला आधी शिरपूर उपजिल्हा रुग्णालय व तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल़े मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध  शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आह़े अल्पवयीन मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती आता बरी आह़े, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
 
मतिमंद मुलीवर बलात्कार; दहा वर्षाची सक्तमजुरी
सोलापूर : अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कृष्णा ऊर्फ चिव्या कैलास पवार (25) याला सहायक जिल्हा दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी दहा वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. बार्शी तालुक्यातील माऊली चौक, अलिपूर रोड येथील अल्पवयीन मतिमंद मुलगी 16 मे 2012 रोजी सायंकाळी 6 वा. वडिलांच्या खाऊ विक्रीच्या गाडीजवळ एकटी थांबली होती. तेव्हा कृष्णा ऊर्फ चिव्या याने संकेश्वर बागेतील बांधकामाच्या मागे नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता.

 

Web Title: Rape of the girl; Arrest warms on the neck