पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

By Admin | Updated: November 8, 2014 04:13 IST2014-11-08T04:13:30+5:302014-11-08T04:13:30+5:30

गोरेगाव पूर्वेकडील संतोष नगर परिसरात एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर मंगळवारी बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

Rape of five-year-old girl | पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील संतोष नगर परिसरात एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर मंगळवारी बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. लक्ष्मण रामप्रसाद गुप्ता (२२) असे अटक आरोपीचे नाव आहे.
गेल्या ६ वर्षांपासून आरोपी हा पीडित मुलीच्या वडिलांना ओळखत आहे. गुप्ता आणि पीडित मुलीचे वडील हे उत्तर प्रदेश जिल्ह्यातील एकाच गावातील राहणारे आहेत. गुप्ता हा एका किराणा मालाच्या दुकानात कामाला आहे. ओळख असल्याने त्याचे मुलीच्या घरी येणे-जाणे होते. मंगळवारी त्याचा पीडित मुलीच्या वडिलांशी पैशांवरून वाद झाला होता. त्यानंतर त्याने सायंकाळी खेळण्यासाठी मुलीला आपल्या घरी नेले. शिवाय मद्याच्या नशेत तिच्यावर बलात्कार केला आणि मुलीला तिच्या घरी नेऊन सोडले. मुलीची प्रकृती बिघडल्याने पालकांनी तिला जोगेश्वरीच्या ट्रॉमा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले; तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले. मुलीच्या पालकांनी त्यानंतर गुप्ताविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिली. पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर दिंडोशी पोलिसांनी बलात्कार, अपहरण आणि बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवून त्याला मंगळवारी अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तर मुलीला पुढील उपचारासाठी के.ई.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती दिंडोशी पोलिसांनी दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rape of five-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.