तीन वर्षांत बलात्कार दुप्पट

By Admin | Updated: January 16, 2016 01:26 IST2016-01-16T01:26:56+5:302016-01-16T01:26:56+5:30

महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत बलात्काराच्या गुन्ह्यांत दुप्पट तर विनयभंगाच्या गुन्ह्यांत तीनपट वाढ झाली आहे. २०१४मध्ये ३४३८ गुन्हे दाखल झाले असून, त्यात अल्पवयीन मुलींवरील

Rape doubled in three years | तीन वर्षांत बलात्कार दुप्पट

तीन वर्षांत बलात्कार दुप्पट

- डिप्पी वांकाणी,  मुंबई
महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत बलात्काराच्या गुन्ह्यांत दुप्पट तर विनयभंगाच्या गुन्ह्यांत तीनपट वाढ झाली आहे. २०१४मध्ये ३४३८ गुन्हे दाखल झाले असून, त्यात अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचे १७२४ गुन्हे समाविष्ट आहेत. शहरांच्या तुलनेत मुंबईत तर ग्रामीण भागाचा विचार करता अमरावती विभागात सर्वाधिक गुन्हे महिलांशी संबंधित आहेत. राज्यभरात २०१४मध्ये जेवढे गुन्हे नोंद झाले त्यात महिलांशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण १०.६८ टक्के आहे.
महाराष्ट्र पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २०१३च्या तुलनेत २०१४मध्ये बलात्काराच्या घटनांत १२.२४ टक्के तर विनयभंगांच्या गुन्ह्यांत २२.९८ टक्के वाढ झाली. याच कालावधीत अपहरणाच्या गुन्ह्यांत ३१.११ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तथापि, हुंडाबळीचे प्रमाण १२.८१ टक्क्यांनी खाली आले; तसेच महिलांच्या छेडछाडीचे गुन्हे ४०.१६ टक्क्यांनी खाली आले.
२०१४मध्ये महाराष्ट्रात महिलांविरुद्धच्या (१ लाख लोकसंख्येमागे महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांचे प्रमाण) गुन्ह्यांचे प्रमाण ४७.५५ टक्के होते. ‘निर्भया प्रकरणाचा’ हा परिणाम असल्याचे महाराष्ट्र पोलीस मानतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, अधिकाधिक महिला त्यांच्यावरील अत्याचाराची तक्रार करण्यास पुढे येत आहेत. खून, दरोडे आदी गुन्ह्यांत महिला बळी ठरल्या असल्यास ते गुन्हे महिलांविरुद्धचे समजले गेलेले नाहीत. जे गुन्हे फक्त महिलांबाबतच घडले आहेत त्यांनाच महिलांविरुद्धचे गुन्हे समजण्यात आले आहे.

राज्यभरात २०१४मध्ये जेवढे गुन्हे नोंद झाले त्यात महिलांशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण
10.68%

२०१४मध्ये ३४३८ गुन्हे दाखल झाले असून, त्यात अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचे गुन्हे
1724

२०१३च्या तुलनेत २०१४मध्ये बलात्काराच्या घटनांत १२.२४ टक्के तर विनयभंगांच्या गुन्ह्यांत २२.९८ टक्के वाढ

राज्यात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांचे प्रमाण47.55%

Web Title: Rape doubled in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.