बलात्कार करणाऱ्याला दहा वर्षे सश्रम कारावास

By Admin | Updated: October 19, 2016 04:43 IST2016-10-19T04:43:39+5:302016-10-19T04:43:39+5:30

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने बलात्कार करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

Rape convict for ten years rigorous imprisonment | बलात्कार करणाऱ्याला दहा वर्षे सश्रम कारावास

बलात्कार करणाऱ्याला दहा वर्षे सश्रम कारावास


अचलपूर (अमरावती) : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने बलात्कार करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. श्रीकृष्ण हिरालाल चिलात्रे (२१, रा. आहाड, ता. चिखलदरा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश एम.एस. शेख यांनी हा निकाल दिला.
आरोपी श्रीकृष्ण याने घराशेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध प्रस्थापित केले. वर्षभर शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला. याबाबत कोणालाही सांगितल्यास, जीवे मारण्याची धमकीसुद्धा आरोपीने तिला दिली. मुलगी गर्भवती राहिली. तिला मूल झाले. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर आरोपी श्रीकृष्ण चिलात्रेला कलम ४ व ५ लैंगिक अत्याचारापासून लहान मुलांचे संरक्षण कायद्यान्वये दोषमुक्त करण्यात आले. मात्र, बलात्कार प्रकरणात न्यायालयाने त्याला १० वर्षांची सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास, तसेच कलम ४५० करिता ५ वर्षांची सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)

Web Title: Rape convict for ten years rigorous imprisonment