पंचतारांकित हॉटेलमध्ये निर्मात्याचा मॉडेलवर बलात्काराचा प्रयत्न
By Admin | Updated: February 4, 2016 11:07 IST2016-02-04T09:25:33+5:302016-02-04T11:07:21+5:30
एका उदयोन्मुख मॉडेलने सांताक्रूझ पोलिस स्थानकात एका विकासकाविरोधात बलात्काराचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली आहे.

पंचतारांकित हॉटेलमध्ये निर्मात्याचा मॉडेलवर बलात्काराचा प्रयत्न
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - एका उदयोन्मुख मॉडेलने सांताक्रूझ पोलिस स्थानकात एका विकासकाविरोधात बलात्काराचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली आहे. मॉडेलने दाखल केलेल्या तक्रारीत सुरेश मेहता यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने सुरेश मेहता यांनी मला पंचतारांकीत हॉटेलमधील एका रुममध्ये बोलवले. तिथे त्यांनी मला दारु पाजण्याचा प्रयत्न केला. लगट करण्याचा प्रयत्न करत त्यांनी मला बिछान्यावर ढकलले. पण मी कशीबशी माझी सुटका करुन तिथून पळ काढला असे या मॉडेलने सांगितले.
विकासक असलेले सुरेश मेहता यांनी आपण चित्रपट निर्माता आहोत असे या मॉडेलला सांगितले होते. मॉडेलकडून तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सुरेश मेहता यांचा शोध सुरु केला आहे.