मनसे उमेदवाराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

By Admin | Updated: October 3, 2014 02:15 IST2014-10-03T02:15:23+5:302014-10-03T02:15:23+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चा उमेदवार सुधाकर खाडे याने जातिवाचक शिवीगाळ करून चाळीस वर्षीय मोलकरणीवर बलात्कार केल्याचा प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला.

Rape against MNS candidate | मनसे उमेदवाराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

मनसे उमेदवाराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

>सांगली : ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चा माजी जिल्हाप्रमुख आणि  तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुधाकर खाडे याने जातिवाचक शिवीगाळ करून चाळीस वर्षीय मोलकरणीवर बलात्कार केल्याचा प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन विश्रमबाग पोलिसांत खाडेविरुद्ध बलात्कार व जातिवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खाडे मूळचा मिरजेतील असून, चार वर्षापासून तो बालाजीनगर येथील ‘शीतल’ बंगल्यात भाडय़ाने राहतो. पीडित महिला तेव्हापासून त्याच्याकडे मोलकरीण म्हणून कामाला आहे. 
सहा महिन्यांपूर्वी खाडेची पत्नी श्वेता कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी खाडे याने अश्लील शिवीगाळ करून बलात्कार केला. त्यानंतर त्याने बंदुकीचा धाक दाखवून हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याचे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटले आह़े यापूर्वीही खाडेविरुद्ध मिरजेत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुनतून त्याची निदरेष मुक्तता झाली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Rape against MNS candidate