परित्यक्त्या महिलेवर बलात्कार

By Admin | Updated: February 9, 2017 23:09 IST2017-02-09T23:09:43+5:302017-02-09T23:09:43+5:30

शारीरिक संबंध ठेवणाऱ्याविरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला.

Rape of abandoned woman | परित्यक्त्या महिलेवर बलात्कार

परित्यक्त्या महिलेवर बलात्कार

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 9 - पतीने सोडून दिलेल्या महिलेला आणि तिच्या मुलांचा सांभाळ करण्याचे आमिष दाखवून पाच महिन्यांपासून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्याविरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

संदीप सुभाष खरात (३०, रा. राजनगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि पीडिता हे ९ आॅक्टोबर २०१६ पासून कालपर्यंत पीडितेच्या राजनगर येथील घरी पती-पत्नीसारखे राहत होते. या काळात आरोपीने पीडितेला तिचा आणि तिच्या मुलांचा सांभाळ करण्याचे आणि तिच्यासोबत लग्न करण्याचे वचन दिले होते.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो तिच्याशी भांडत होता आणि विवाह करण्यास टाळाटाळ करीत होता. दोन दिवसांपूर्वी त्याने लग्नाला नकार दिला. पीडितेने थेट त्याच्या विरोधात गुरुवारी बलात्काराची फिर्याद नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक अमोल सोनवणे तपास करीत आहेत.

Web Title: Rape of abandoned woman