प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा रावसाहेब दानवे यांची निवड
By Admin | Updated: January 18, 2016 16:53 IST2016-01-18T16:51:22+5:302016-01-18T16:53:47+5:30
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा खासदार रावसाहेब दानवे यांची निवड आज करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या

प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा रावसाहेब दानवे यांची निवड
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा खासदार रावसाहेब दानवे यांची निवड आज करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईतील कार्यालयात रावसाहेब दानवे यांची दुस-यांदा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
रावसाहेब दानवे हे केंद्रात मंत्री असताना त्यांना तेथून प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात पाठविण्यात आले. त्यानंतर पुन्हा त्यांच्याच गळ्यात प्रदेशाध्यपदाची माळ घालण्यात आली. रावसाहेब दानवे हे जालन्याचे खासदार असून मराठा समाजाचे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दोन्ही बड्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.
रावसाहेब दानवे यांनी रविवारी दिल्लीत पक्षाध्यक्ष अमित शहा व इतर वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन वर्षभरातील कामकाजाचा लेखाजोखा सादर केला. भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेंतर्गत राज्यात १ कोटी ५ लाख सदस्यांची नोंदणी करून, यापूर्वीच दानवे यांनी पक्षश्रेष्ठींकडून प्रशस्ती मिळविली होती. शिवाय वर्षभरात ७०० प्रशिक्षण शिबिरे घेऊन संघटना बांधणीसाठी केलेले प्रयत्नही त्यांच्यासाठी फायदेशीर ठरले.