खंडणी पथकाने जप्त केली ४४ रिव्हॉल्व्हर

By Admin | Updated: January 20, 2017 04:12 IST2017-01-20T04:12:19+5:302017-01-20T04:12:19+5:30

चार वर्षांत दोन रायफल आणि ४४ रिव्हॉल्व्हर-पिस्तूल आणि गावठी कट्ट्यांसह १३७ काडतुसे हस्तगत केली आहेत.

The ransom team seized 44 revolvers | खंडणी पथकाने जप्त केली ४४ रिव्हॉल्व्हर

खंडणी पथकाने जप्त केली ४४ रिव्हॉल्व्हर


ठाणे : शहर पोलीस दलाच्या ठाणे खंडणीविरोधी पथकाने मागील चार वर्षांत दोन रायफल आणि ४४ रिव्हॉल्व्हर-पिस्तूल आणि गावठी कट्ट्यांसह १३७ काडतुसे हस्तगत केली आहेत. या इतक्या मोठ्या प्रमाणात जप्त केलेल्या शस्त्रसाठ्याने याबाबत तर्कवितर्क वर्तवण्यास सुुरुवात झाली आहे. त्यामध्ये २०१३ मध्ये सर्वाधिक शस्त्रसाठा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खंडणीखोर असो वा इतर गुन्ह्यांतील पसार व पाहिजे असलेल्या आरोपींना पकडताना, ठाणे खंडणीविरोधी पथकाने इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. त्यामध्ये पिस्तूल आणि काडतुसे यांचा सर्वाधिक समावेश आहे. त्याचबरोबर या पथकाने ९ रिकामे मॅगझीन हस्तगत केले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The ransom team seized 44 revolvers