शिक्षकाकडून ५ लाखांची खंडणी उकळली
By Admin | Updated: April 6, 2015 03:23 IST2015-04-06T03:23:21+5:302015-04-06T03:23:21+5:30
जागेचा ताबा सोडण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकाकडून ५ लाखांची खंडणी उकळल्यानंतरही आणखी ५ लाखांची मागणी करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध मोहाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे़

शिक्षकाकडून ५ लाखांची खंडणी उकळली
धुळे : जागेचा ताबा सोडण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकाकडून ५ लाखांची खंडणी उकळल्यानंतरही आणखी ५ लाखांची मागणी करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध मोहाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे़
सेवानिवृत्त शिक्षक रोहिदास भिवसन शिंदे (७२) यांचा मोहाडी शिवारात प्लॉट आहे़ सुनंदा व बाळकृृष्ण अमृतकर (रा़ मोहाडी) यांनी त्यावरील ताबा सोडण्यासाठी शिंदे यांच्याकडून ५ लाख रुपयांची खंडणी घेतली; मात्र त्यानंतरही त्यांनी ताबा सोडला नाही. उलट १ एप्रिल रोजी अमृतकर दाम्पत्याने शिंदे यांच्याकडे आणखी ५ लाख रुपये मागितले तसेच पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी शिंदे यांना दिली. २०१२पासून हा प्रकार सुरू असल्याने शेवटी शिंदे यांनी मोहाडी पोलिसांत फिर्याद दिली. (प्रतिनिधी)