ठाण्यात चार पोलिसांवर खंडणीचा गुन्हा
By Admin | Updated: July 31, 2014 04:11 IST2014-07-31T04:11:30+5:302014-07-31T04:11:30+5:30
याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसून हे प्रकरण ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली

ठाण्यात चार पोलिसांवर खंडणीचा गुन्हा
ठाणे : चोरीचा माल विकत घेतला आहे, असे खोटे आरोप करून एका भंगार विक्रेत्याला जबरदस्तीने पोलीस ठाण्यात डांबून ठेवून त्याच्यासह अन्य एका व्यावसायिकाकडून ४ लाखांची खंडणी घेतल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस हवालदार राजेंद्र निकम, संदीप शिर्के, प्रकाश पाटील आणि पोलीस नाईक किशोर थोरात यांच्याविरोधात नौपाडा ठाण्यातच गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसून हे प्रकरण ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्या घटनेमुळे पुन्हा एकदा नौपाडा पोलीस ठाणे चर्चेत आले आहे.
वैतीवाडीतील भंगार विक्रेते रूपलाल पटेल यांनी दिलेल्या तक्रारीत, नौपाडा पोलीस ठाण्यातील डी.बी. स्टाफ असलेल्या पाच पोलिसांनी ९ ते ११ जूनदरम्यान त्यांना आर्थिक लाभासाठी बेकायदेशीररीत्या नौपाडा पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. तसेच चोरीचा माल विकत घेतल्याचे खोटे आरोप आणि मारहाण करून आरोपी करण्याची धमकी देऊन त्यांच्या पाकिटातील ४ हजार ९०० रुपये तसेच घरातील १५ हजार रुपये काढून घेतले.
त्याचबरोबर त्यांचे ओळखीचे व्यावसायिक हरजीलाल पटेल यांचे नाव त्यांच्याकडून वदवून घेत त्यांना सोडण्यासाठी ४ लाख रुपये आणि त्यांच्या दुकानातील तांब्याच्या मालाच्या ५ गोण्या दुकानातून उचलून आणल्या. तसेच चोरीच्या गुन्'ासंदर्भात खोटी कागदपत्रे तयार करून त्याच्यावर त्यांच्या स्वाक्षरी घेऊन पुढील तपास सुरू केल्याचे म्हटले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केलेल्या गुन्'ात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई के ली जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. (प्रतिनिधी)