शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी, मध्यस्थ अन् टक्केवारीलाच सरकारचे प्राधान्य; केशव उपाध्ये यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 10:56 IST

जनहिताची कामे कधी करणार?, सरकारला सवाल.

नारायण जाधवजागतिकीकरणाच्या स्पर्धेत अनेक नामांकित अर्थसंस्था अर्थपुरवठा करण्यासाठी बाजारात उपलब्ध असतांना एमएमआरडीएने ६० हजार कोटींच्या कर्जासाठी मध्यस्थाला १२० कोटींची दलाली देण्याचा ठराव मंजूर करणे धक्कादायक आहे. तसेही महाविकास सरकारनेे जनहिताच्या कामांऐवजी खंडणी, टक्केवारीलाच प्राधान्य दिल्याचे त्यांच्या आतापर्यंतच्या कारभारावरून दिसत आहे, अशी खरमरीत टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. भाजप हा विषय लावून धरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘६० हजार कोटींच्या कर्जासाठी १२० दलाली’ या मथळ्याखालील ठळक वृत्त ‘लोकमत’ने १७ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध करताच त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या कर्जासाठी एमएमआरडीएने मध्यस्थ म्हणून एसबीआय कॅपिटल लिमिटेडची नियुक्ती करून त्यांना एकूण कर्जाच्या ०.२० टक्के सल्लागार शुल्क देण्याचे निश्चित केले आहे. ही रक्कम १२० कोटींच्या घरात  जाते. एमएमआरडीएच्या या निर्णयाचा निषेध करून भाजपने थेट महाविकास आघाडी सरकारवरच निशाणा साधला आहे. 

राज्यात सत्तेवर आल्यापासून महाविकास आघाडी सरकार हे खंडणी, टक्केवारी आणि मध्यस्थ नेमण्यासाठीच बदनाम असल्याचे महाराष्ट्रातील जनतेला दिसून आहे. दुष्काळ, आरक्षणासह इतर जनहिताच्या कामांना त्यांनी प्राधान्य दिलेले नाही.

कर्जासाठी मध्यस्थ नेमण्याचे कारण काय?आताही जागतिक व्यासपीठावर बाजारात अनेक बँक, संस्था अर्थपुरवठा करण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे ६० हजार कोटींचे कर्ज उभे करण्यासाठी मध्यस्थ नेमण्याचे कारण काय, देकार का मागविले नाहीत, असे प्रश्न उपाध्ये यांनी विचारले आहेत. अशाप्रकारे मध्यस्थ नेमून जनेतच्या पैशांची अशी लूट करण्यापेक्षा जनहिताच्या कामांना प्राधान्य द्यावे, असा टोला त्यांनी लगावला  आहे.

टॅग्स :mmrdaएमएमआरडीएMahavikas Aghadiमहाविकास आघाडी