शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीचा विषय बाजूला ठेऊन रणजितदादा बोलले मोदींबद्दल भरभरून बोलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 20:13 IST

रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपात; उद्या प्रवेश, कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला निर्णय

ठळक मुद्देया निर्णयाने राष्टÑवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली असून, माढा मतदारसंघात पक्षाची स्थिती आणखी बिकट या बैठकीस राष्टÑवादीचे मुख्य नेते उपस्थित नसले तरी करमाळ्याचे शिवसेनेचे आमदार नारायण पाटील हे उपस्थित होते

अकलूज: सोलापूर जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असलेले कृष्णा भीमा स्थिरीकरण, रस्त्यांचे चौपदरीकरण, पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्गासह साखर कारखानदारी यासारखे प्रश्न सोडविण्याची ताकद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्यात असल्याचे उदगार माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी काढले़ यावेळी भाजपाकडून माढा लोकसभेसाठी उमेदवारी मिळणार की नाही याबाबत मात्र ते काहीच बोलले नाही़ मात्र माझ्या उमेदवारीचा निर्णय भाजपच घेईल असेही ते रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून राष्टÑवादी काँग्रेस पक्षात अपमान होत असल्याने मोहिते-पाटील यांनी उद्या मुंबईत भाजपात प्रवेश करीत असल्याचा निर्णय घेतला. अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर मोहिते-पाटील समर्थकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

या निर्णयाने राष्टÑवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली असून, माढा मतदारसंघात पक्षाची स्थिती आणखी बिकट झाली आहे. या बैठकीस राष्टÑवादीचे मुख्य नेते उपस्थित नसले तरी करमाळ्याचे शिवसेनेचे आमदार नारायण पाटील हे उपस्थित होते. 

या बैठकीस खा. विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील,  जयसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, राष्टÑवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील, मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा अरूणा माळी, करमाळा बाजार समिती सभापती बंडगर, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, शफी इनामदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, राष्टÑवादी काँग्रेसचे माळशिरस तालुकाध्यक्ष संग्रामसिंह जहागीरदार, नागनाथ कदम, प्रा. रवींद्र ननवरे, संतोष नेहतराव (पंढरपूर) यांच्यासह मोहिते-पाटील समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले, १९९९ साली अशीच बैठक घेतली होती. त्यानंतर ही बैठक आहे. शेती, पाणी व कारखानदारी यासाठी सहकार महर्षिंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सत्तेचा वापर सर्वसामान्यांसाठी झाला पाहिजे म्हणून वसंतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिते-पाटील यांनी समाजकारण केले. गेल्या दहा वर्षांपासून आमची चेष्टा होत आहे. कृष्णा भीमा-स्थिरीकरण हे पक्षांतराचे कारण आहे. भाजपाच्या नेत्यांना या योजनेची माहिती दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली. गावे ओसाड होणार नाही, याची ताकद फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, गडकरी आणि फडणवीस यांच्यात आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत. उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे रणजितसिंह म्हणाले. याला विजयसिंह मोहिते-पाटील यांची सहमती असल्याचेही रणजितसिंह यांनी सांगितले.जिल्हा परिषद सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी आपण अद्याप राष्टÑवादीचे सभासद नाहीत. आपण दादांबरोबर आहोत. सर्व कार्यकर्त्यांचे मत म्हणजे विजयदादा असल्याचे त्यांनी सांगितले. 

सहकार महर्षि कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी गेली ६७ वर्षे मोहिते-पाटील यांनी केवळ समाजकारण करीत असल्याचे सांगितले.

करमाळा बाजार समिती सभापती बंडगर यांनी संजय शिंदे यांच्यावर टीका करताना दोन दोन तालुक्यात काम करणारी बांडगुळे असल्याचे सांगितले.

सविताराजे भोसले यांनी विजयदादा भोळे आहेत. इतके दिवस मानहानी सहन केल्याचे सांगितले. माढा लोकसभा मतदारसंघात सर्जिकल स्ट्राईक करावा असे मत संतोष देवकते (सांगोला) यांनी व्यक्त केले.

अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. वजीर शेख यांनी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांच्यावर तोफ डागली. साळुंखे बैठकीत आमचे नावही घेत नव्हते. आमचा सासुरवास संपला. आपण अल्पसंख्याक सेलचा राजीनामा देत असल्याची त्यांनी घोषणा केली.

सोलापूरचे माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, दीपक वाडदेकर, हरिभाऊ मगर, गणपत वाघमोडे, भरतेश गांधी (माण), नगराध्यक्ष विलास माने (म्हसवड), रामदास शेंडगे (सरडे), त्रिभुवन धार्इंजे, तरडगावचे सरपंच डॉ. अमोल घाडगे, अख्तर पटेल (करमाळा), दत्ता कापरे, देवानंद बागल (करमाळा), सतीश देशमुख (करकंब),अर्जुन केदार, प्राचार्य बिले, भारत पाटील, योगेश बोबडे यांचीही भाषणे झाली.

टॅग्स :SolapurसोलापूरVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूक