‘रंगाअण्णा वैद्य’ पुरस्कार यदू जोशी यांना जाहीर

By Admin | Updated: May 29, 2017 04:31 IST2017-05-29T04:31:19+5:302017-05-29T04:31:19+5:30

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य स्मृति राज्यस्तरीय पुरस्कार ‘लोकमत’चे यदू जोशी यांना

'Rangana Anna Vaidya' award to Yudhoshi | ‘रंगाअण्णा वैद्य’ पुरस्कार यदू जोशी यांना जाहीर

‘रंगाअण्णा वैद्य’ पुरस्कार यदू जोशी यांना जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य स्मृति राज्यस्तरीय पुरस्कार ‘लोकमत’चे यदू जोशी यांना जाहीर झाला आहे. स्व. बाबुराव जक्कल स्मृति जिल्हास्तरीय पुरस्कार पत्रकार संजय पाठक यांना दिला जाणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी दिली़
२५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप आहे. १५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे जिल्हास्तरीय पुरस्काराचे स्वरूप आहे.
रविवारी पत्रकार संघाच्या कार्यालयात पुरस्कार निवड समितीची बैठक ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने, ज्येष्ठ साहित्यिक दत्ता गायकवाड, अ‍ॅड. भगवान वैद्य, अ‍ॅड. शंकर पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. यात ही निवड करण्यात आली. पुरस्काराचे वितरण जूनच्या पहिल्या आठवड्यात केले जाणार आहे.

Web Title: 'Rangana Anna Vaidya' award to Yudhoshi