गुजरातीद्वेषी वक्तव्याप्रकरणी राणेंना नोटीस
By Admin | Updated: November 28, 2014 08:37 IST2014-11-28T02:05:29+5:302014-11-28T08:37:36+5:30
आमदार नितेश राणो यांनी केलेले गुजरातीद्वेषी वक्तव्य व माजी उद्योगमंत्री नारायण राणो यांनी त्याचे केलेले समर्थन याची दखल घेत उच्च न्यायालयाने गुरुवारी राणो पिता-पुत्रला नोटीस जारी केली आहे.

गुजरातीद्वेषी वक्तव्याप्रकरणी राणेंना नोटीस
मुंबई : आमदार नितेश राणो यांनी केलेले गुजरातीद्वेषी वक्तव्य व माजी उद्योगमंत्री नारायण राणो यांनी त्याचे केलेले समर्थन याची दखल घेत उच्च न्यायालयाने गुरुवारी राणो पिता-पुत्रला नोटीस जारी केली आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने शासनाला दिले आहेत.
या प्रकरणी भगवानजी दयानजी यांनी जनहित याचिका केली आहे. नितेश राणो यांचे असे वक्तव्य व त्यावर नारायण राणो यांनी केलेले स्पष्टीकरण, हे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारे आहे. विशेष म्हणजे खार पोलीस ठाण्यात याचा गुन्हादेखील नोंदवण्यात आला आहे. मात्र याची चौकशी होत नाही. तेव्हा याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. न्या. अनुप मोहता यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. ही सुनावणी दोन आठवडय़ांसाठी तहकूब केली.