राणेंचे ‘ईडी’ प्रकरण वस्तुस्थिती
By Admin | Updated: January 30, 2017 00:23 IST2017-01-30T00:23:02+5:302017-01-30T00:23:02+5:30
काँगे्रसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची ‘ईडी’ चौकशी ही ‘वस्तुस्थिती’ आहे, असा दावा भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत केला.

राणेंचे ‘ईडी’ प्रकरण वस्तुस्थिती
वैभववाडी : काँगे्रसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची ‘ईडी’ चौकशी ही ‘वस्तुस्थिती’ आहे, असा दावा भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत केला. ‘छगन भुजबळांनंतर काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे ‘ईडी’ च्या रडारवर’ असे वृत्त महिनाभरात दुसऱ्यांदा पसरले आहे. त्याबाबत बोलताना भंडारी म्हणाले, निवडणुका आल्या की, अशा बातम्या येतच असतात. भुजबळांशेजारी अनेक खोल्या रिकाम्या आहेत. राणेंची चौकशी सुरू आहे, असे मी म्हणणार नाही आणि चौकशी सुरू नाही असेही नाही. मात्र, राणे यांचे ‘ईडी’ प्रकरण ही ‘वस्तुस्थिती’ आहे.