शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

राणे समर्थकाची कार फोडली, मनसे जिल्हाध्यक्षासह आठजण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 21:19 IST

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या मध्यरात्री कुडाळ तालुक्यातील भोईचे केरवडेचे उपसरपंच तसेच कट्टर राणे समर्थक राजन मल्हार यांच्या कारची तोडफोड

कुडाळ : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या मध्यरात्री कुडाळ तालुक्यातील भोईचे केरवडेचे उपसरपंच तसेच कट्टर राणे समर्थक राजन मल्हार यांच्या कारची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्यासह भोईचे केरवडे येथील आठ जणांवर कुडाळ येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मल्हार यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. कुडाळ तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यामध्ये भोईचे केरवडे ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. दरम्यान, मतदानाच्या मध्यरात्री मल्हार यांच्या कारवर भोईचे केरवडे येथे हल्ला करण्यात आला. यात त्यांच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत मल्हार यांनी म्हटले आहे की, ते नोकरीनिमित्त कणकवली येथे राहतात. भोईचे केरवडे ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने ते त्यांच्या पॅनेलच्या प्रचारासाठी सध्या गावी आले होते. १५ आॅक्टोबर रोजी कुडाळ येथे त्यांच्या कारमध्ये इंधन भरून रात्री ९ वाजता केरवडे येथे ते आले. त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे शेजारी बाबू उर्फ बाळकृष्ण सावंत होते. दरम्यान, ते कुडाळहून गावी येताना जाधववाडी येथील रस्त्यावर पावसामुळे पाणी आल्याने त्यांनी घरी जाण्यासाठी उभ्या असलेल्या श्रावण बांदेकर, सचिन परब या ग्रामस्थांना स्वत:च्या कारमध्ये घेतले व केरवडे-बोडदेवाडी येथे सोडले. त्यानंतर मल्हार पुढे घरी जाण्यासाठी निघाले. रात्री १.१५ वाजण्याच्या सुमारास ते भोईचे केरवडे-मळेवाडी येथे आले असता दुचाकीवरून त्यांच्याच गावातील सुबोध परब व सिद्धेश परब आले. यातील सिद्धेश परब याने त्यांच्याकडील कोणत्यातरी लोखंडी वस्तूने प्रहार करून मल्हार यांच्या कारची समोरील काच फोडली. त्यानंतर मागोमाग कार व दुचाकीने आलेल्या धीरज परब, विवेक परब, विनित परब, सुशांत परब, संतोष परब या सर्वांनी त्यांच्याकडील लोखंडी शिगेने कारच्या काचा, पत्रा, हेडलाईट फोडून नुकसान केले. यामध्ये धीरज परब हा त्याच्या ताब्यातील वाहन घेऊन आला, अशी माहिती मल्हार यांनी दिली. कारच्या काचा फोडताना कारमध्ये आपण व बाबू सावंत हे अडकून पडलो होतो व या फुटलेल्या काचांच्या तुकड्यामुळे आमच्या हातांना व पायांना दुखापत झाल्याची माहिती राजन मल्हार यांनी दिली. गाडीवर हल्ला केल्यानंतर धीरज परब व त्यांच्या सोबतच्या सर्वांनी ‘तू उद्या ग्रामपंचायतीकडे दिसलास तर याद राख,’ अशी धमकी देत शिवीगाळ केली व ते निघून गेले, असे मल्हार यांनी तक्रारीत म्हटले आहे. याबाबत कुडाळ पोलिसांत बेकायदेशीर जमाव करीत अडवणूक करून वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी तसेच धमकी देऊन दुखापत केल्याप्रकरणी संशयित आरोपी धीरज परब, सिद्धेश परब, सुबोध परब, विवेक परब, विनित परब, सुशांत परब, संतोष परब, सचिन ठाकूर आदी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित ताब्यात : दत्तात्रय बाकारेही घडलेली घटना व ग्रामपंचायत निवडणुकांचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणातील सर्व संशयित आरोपींना भोईचे केरवडे येथून तत्काळ ताब्यात घेऊन अटक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय  बाकारे यांनी दिली.घटनास्थळावरून पोलिसांनी दोन लोखंडी शिगा ताब्यात घेतल्या आहेत. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे करीत आहेत. तक्रारदार राजन मल्हार हे कट्टर राणे समर्थक आणि भोईचे केरवडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत. संशयित आरोपी धीरज परब हे मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत. धीरज परब यांचे वडील विश्वनाथ परब हे भोईचे केरवडे  ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील उमेदवार आहेत. धीरज परबसह तिघेजण नजरकैदेत-मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने आठ जणांपैकी पाच जणांना जामीन मंजूर केला. धीरज परबसह विनित परब व विवेक परब यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही नजरकैद पुढील ४८ तासांची असणार आहे, असे न्यायालयाने पोलिसांना सांगितले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे MNSमनसे