काँग्रेसच्या एकाही नेत्यामध्ये नसलेली धमक राणेसाहेबांनी दाखवली - नितेश
By Admin | Updated: April 16, 2015 18:27 IST2015-04-16T18:27:43+5:302015-04-16T18:27:43+5:30
काँग्रेसमधल्या एकाही नेत्याकडे वांद्र्यामधून लढायची धमक नव्हती, जी राणेसाहेंबांनी दाखवली असे सांगत नितेश राणे यांनी काँग्रेसविरोधात शरसंधान केले

काँग्रेसच्या एकाही नेत्यामध्ये नसलेली धमक राणेसाहेबांनी दाखवली - नितेश
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - काँग्रेसमधल्या एकाही नेत्याकडे वांद्र्यामधून लढायची धमक नव्हती, जी राणेसाहेंबांनी दाखवली असे सांगत नितेश राणे यांनी काँग्रेसविरोधात शरसंधान केले असून राणे व काँग्रेस यांच्यात आलबेल नसल्याचे ध्वनित केले आहे. एमआयएम ही पार्टी शिवसेनेचेच पिल्लू असल्याचे सांगताना या पार्टीने मुस्लीम तरूणांना आपलं राजकारण साधण्यासाठी ड्रग्जच्या नादी लावल्याचा आरोपही नितेश यांनी केला आहे.
निवडणूक हरल्यानंतर नारायण राणे यांनी काँग्रेसचा पाठिंबा आपल्याला होता, महत्त्वाचे नेते प्रचारासाठी उतरले होते अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र त्यांच्या मालकिच्या प्रहार या वृत्तपत्रात मात्र राणे लढले आणि काँग्रेस हरली असं सांगत काँग्रेसच्या नेत्यांनी राणेंच्या विरोधात काम केल्याची भूमिका मांडण्यात आली. याच भूमिकेची री ओढताना नितेश राणे यांनीही काँग्रेसच्या नेत्यांवर तोंडसूख घेतले आणि राणे व काँग्रेस यांच्यामध्ये धुसफूस सुरूच असल्याचे संकेत दिले.