राणे कुटुंबीयांवर राजन तेली यांचा आरोप
By Admin | Updated: May 9, 2015 01:14 IST2015-05-09T01:14:55+5:302015-05-09T01:14:55+5:30
जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्या गाडीचा झालेला पाठलाग व त्यानंतर त्याच गाडीची झालेली तोडफोड पाहता हा जिवे

राणे कुटुंबीयांवर राजन तेली यांचा आरोप
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्या गाडीचा झालेला पाठलाग व त्यानंतर त्याच गाडीची झालेली तोडफोड पाहता हा जिवे मारण्याचा कट असून, माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी राणे कुटुंबीयांची राहील, असा आरोप राजन तेली यांनी केला आहे. अशा स्वरूपाचे अॅफिडेव्हिटही देणार असल्याचे तेली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.