शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राणेंच्या भाजपा प्रवेशाबाबत कोकणमधील भाजपाच्या नेते, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 04:44 IST

भाजपातीलच काही नेत्यांचा विरोध असल्याने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश अडला असल्याची चर्चा आहे. राणेंनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले.

विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपातीलच काही नेत्यांचा विरोध असल्याने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश अडला असल्याची चर्चा आहे.राणेंनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले. तेव्हापासून त्यांनी भाजपावर टीकेची एकही संधी सोडलेली नाही. त्यांच्यावर भ्रष्टाचारापासून अनेक आरोप भाजपाचे नेते करीत आले आहेत. असे असताना त्यांना भाजपात घेतले तर त्यातून पक्षजनांमध्ये काय संदेश जाईल, असा सवााल आता केला जात आहे. राणेंना पक्षात घेण्यास विरोध असलेल्या नेत्यांनीच काही महिन्यांपूर्वी त्यांचा प्रवेश रोखून धरण्यात यश मिळविले होते. ‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांविरुद्ध आरोप करीत आम्ही सत्तेत आलो, त्यांनाच पक्षात घेतले तर ‘पार्टी विथ द डिफरन्स’चे काय होईल, असा सवाल या नेत्यांनी पक्षनेतृत्वाकडे केला आहे, असे सूत्रांनी सांगितले.आघाडी सरकारच्या काळात मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे धसास लावणारे नेते होते तसे काही ठिकाणी मंत्र्यांशी दोस्ती ठेवणारेही नेते भाजपा व शिवसेनेत होते आणि त्याबद्दल वेळोवेळी राजकीय चर्चादेखील होत आली. तथापि, काँग्रेस-राष्ट्रवादीशी कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेता कामा नये, आपण त्यांना विरोध करण्याबाबत ठामच राहिले पाहिजे, असे मानणारे नेतेही भाजपात होते आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यात प्रमुख मानले जात होते.राणे उद्या भाजपात आले तर त्यांचे स्थान काय असेल, आज प्रदेश भाजपात प्रस्थापित असलेल्या नेत्यांच्या रांगेत ते कोणाचे स्थान घेतील, विशेषत: मराठा नेता म्हणून त्यांना समोर करण्यात आले तर पक्षात सध्या असलेल्या वरिष्ठ मराठा नेत्यांना ते स्वीकारार्ह असेल काय हे मुद्देही पक्षांतर्गत चर्चेत आहेत.राणेंच्या संभाव्य भाजपा प्रवेशाबाबत कोकणमधील भाजपाच्या नेते, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे म्हटले जाते. काही स्थानिक नेत्यांनी प्रदेश नेतृत्वाकडे तशी भावनाही व्यक्त केल्याची माहिती आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnvisदेवेंद्र फडणवीस