रामराजेंनी केली मध्यस्थांकरवी याचना!
By Admin | Updated: April 4, 2015 04:23 IST2015-04-04T04:23:54+5:302015-04-04T04:23:54+5:30
रामराजेंच्या काळातील जलसंपदा विभागातील तीन चौकशा सुरू आहेत. कोंडाणे धरणाप्रमाणेच निवकणे धरणाचीही चौकशी सुरू झाली आहे.

रामराजेंनी केली मध्यस्थांकरवी याचना!
सातारा : रामराजेंच्या काळातील जलसंपदा विभागातील तीन चौकशा सुरू आहेत. कोंडाणे धरणाप्रमाणेच निवकणे धरणाचीही चौकशी सुरू झाली आहे. अशा अनेक चौकशांचा ससेमिरा आता सुरू होणार आहे. नीरा-देवघरच्या पाण्याविषयी आम्ही फलटणला बैठक घेणार समजल्यावर मध्यस्थांकरवी हा प्रश्न जास्त लावून धरू नका, अशी याचनाही याच रामराजेंनी केली, असा गौप्यस्फोट खासदार उदयनराजे भोसले यांनी एका पत्रकान्वये केला आहे.
आपली खुर्ची आणि लाल दिवा सुरक्षित ठेवून, तुम्ही लढण्याची भाषा करीत आहात म्हणजे पडले तरी तुमचा लाल दिवा सुरक्षित, नाक कापले गेलं तरी भोके सुरक्षित अशी तुमची रावणाची चाल आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)