नगरमध्ये रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक
By Admin | Updated: March 29, 2015 01:12 IST2015-03-29T01:12:25+5:302015-03-29T01:12:25+5:30
येथील रामनवमी मिरवणुकीत गालबोट लागले. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी दगडफेक झाली़ रस्त्यांवर दगडांचा खच पडला होता़ पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

नगरमध्ये रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक
अहमदनगर : येथील रामनवमी मिरवणुकीत गालबोट लागले. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी दगडफेक झाली़ रस्त्यांवर दगडांचा खच पडला होता़ पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते़
हिंदू राष्ट्र सेनेने सुमारे २० फूट उंच मूर्तीची मिरणूक काढली. गोवंश हत्या बंदीच्या स्वागतार्थ मिरवणुकीत गाईंचे दोन पुतळेही ठेवण्यात आले होते़ मिरवणूक आशा टॉकीज चौकात येताच तिच्यावर दगडफेक झाली़ पोलिसांनी मिरवणुकीतील तरुणांवर लाठीचार्ज केला़ दगडफेक होत असलेल्या इमारतीची माहिती देणाऱ्या तरुणांवरच पोलिसांनी लाठीमार केला़ त्यामुळे चिडलेल्या तरुणांनी पोलिसांना लक्ष्य करीत त्यांच्या वाहनांवर तुफान दगडफेक केली़ दरम्यान बंदोबस्त वाढ केली आहे.