रमेश कदमच्या संपत्तीची चौकशी
By Admin | Updated: August 31, 2015 01:27 IST2015-08-31T01:27:45+5:302015-08-31T01:27:45+5:30
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख आरोपी व राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यास सोबत

रमेश कदमच्या संपत्तीची चौकशी
औरंगाबाद : अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख आरोपी व राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यास सोबत घेऊन राज्य गुन्हा अन्वेषण पथक (सीआयडी) २९ आॅगस्टपासून औरंगाबाद मुक्कामी आहे. कदम याच्या येथील संपत्तीची चौकशी सुरूआहे.
रविवारी दिवसभर कदम याने औरंगाबादेत खरेदी केलेल्या संपत्तीची अधिकाऱ्यांनी पाहणी केली व ज्यांच्याकडून संपत्ती खरेदी केली त्यांचे जवाब नोंदवून घेण्यात आले. साठे महामंडळातील घोटाळ््याप्रकरणी मुंबईतील दहीसर पोलीस ठाण्यात कदमसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राज्य सीआयडी तपास करीत आहे.
तपास अधिकाऱ्यांनी रविवारी कदमच्या सिडकोतील भक्तीनगरमधील भूखंडावरील बंगल्याची पाहणी केली. औरंगाबादेतील पवनदीपसिंग कोहली यांना ११ कोटी ५० लाख रुपयांचा डीडी देऊन त्याने बीड बायपास येथे ६२ गुंठे जमीन खरेदी केली. यूपीएससी आणि एमपीएससी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याकरिता त्याने महामंडळाच्या नावे जालना रोडवरील फतेपूर येथील २ एकर जमीन खरेदी करण्यासाठी महामंडळाकडून १० कोटी ७५ लाख रुपये घेतले. या जमिनीपैकी त्याने २० गुंठे जमीन महामंडळाच्या नावे केली, तर उर्वरित जमीन स्वत:च्या नावे केली. अधिकाऱ्यांनी त्यास सोबत घेऊन जागांची पाहणी केली.
या प्रकरणातील काही लोकांचे जवाब नोंदवून घेतले. आमचा तपास सुरू आहे, असे पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)