अटक टाळण्यासाठी रमेश कदमचे भारतभ्रमण !
By Admin | Updated: August 20, 2015 01:27 IST2015-08-20T01:27:28+5:302015-08-20T01:27:28+5:30
‘चोर तो चोर वर शिरजोर’ या म्हणीचा अनुभव सध्या राज्य गुन्हे अन्वेषण खात्याला (सीआयडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांच्या प्रकरणात येत

अटक टाळण्यासाठी रमेश कदमचे भारतभ्रमण !
डिप्पी वांकाणी, मुंबई
‘चोर तो चोर वर शिरजोर’ या म्हणीचा अनुभव सध्या राज्य गुन्हे अन्वेषण खात्याला (सीआयडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांच्या प्रकरणात येत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या निधीच्या वाटपासाठी मी सही केलेला एक तरी कागद दाखवा, असे आव्हान त्याने चौकशी अधिकाऱ्यांना दिले आहे. या महामंडळाच्या निधीच्या कथित भ्रष्टाचाराबद्दल कदमवर आरोप आहेत. त्याच महामंडळातील आर्थिक गैरव्यवहारांची तक्रार करायला मीच निघालो होतो ही वस्तुस्थिती आहे, असे त्याने सीआयडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले. सीआयडीमधील अंतर्गत सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार रमेश कदमने बनावट ओळखपत्रांच्या आधारावर काश्मीर, बंगळुरू, दिल्ली आणि कन्याकुमारी अशा विविध ठिकाणी प्रवास केला व तो गेल्या महिन्यात भूमिगत झाल्यापासून पंचतारांकित हॉटेल्समध्ये मुक्कामाला होता.
महामंडळात मी अ-कार्यकारी (नॉन एक्झिक्युटिव्ह) व्यक्ती होतो व मी महामंडळाच्या निधीचे वितरण किंवा त्याच्या निधीच्या प्रस्तावांच्या दस्तावेजांवर कधीही स्वाक्षरी केली नाही, असे त्याने आम्हाला सांगितल्याचे अधिकारी म्हणाला. माझी सही असलेला एक तरी कागद दाखवा, असे तो सतत आम्हाला म्हणत आहे. आता तो महामंडळाचे महाव्यवस्थापक आणि उप महाव्यवस्थापक अशा सदस्यांना चुकीच्या गोष्टींसाठी दोष देत आहे, असे वरिष्ठ अधिकारी म्हणाला.
गेल्या महिन्यात कदमने काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास केला. त्याने या गुन्ह्यातील त्याच्या साथीदारांची ओळखपत्रे घेऊन त्यांच्या छायाचित्रांच्या जागी स्वत:चे छायाचित्र लावले व त्याचा वापर केला. वस्तुस्थिती ही आहे, की त्याने येथून पुण्यातील हॉटेलसाठी बुकिंग केलेच नव्हते. काश्मीरमधील गँ्रड हयात रिजन्सीमध्ये तो राहिला व तेथून त्याने पुण्यातील हॉटेलसाठी बुकिंग केले, असे हा अधिकारी म्हणाला.