रमेश कदमची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 04:49 IST2017-08-02T04:48:42+5:302017-08-02T04:49:07+5:30

रमेश कदमची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव
मुंबई : मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचा दावा करणारे आमदार रमेश कदम यांनी, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला आहे. या अधिवेशनात मंजुळाच्या कोठडीतील मृत्युसंदर्भातील महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करायचा असल्याचे, कदम यांनी जामीन अर्जात म्हटले आहे.
रमेश कदम हे मोहोळ मतदारसंघाचे आमदार आहेत. अण्णाभाऊ साठे महामंडळात कोट्यवधींचा घोटाळा केल्याप्रकरणी त्यांना अटक केली असून, ते २४ महिने आर्थर रोड कारागृहात आहेत. आर्थर रोड कारागृहातच त्यांचा मुक्काम असल्याने, मंजुळा शट्येच्या हत्येचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचा दावा कदम यांनी केला आहे. कदम यांनी गुन्हे अन्वेषण विभागापुढे जबानीत शेट्ये हत्याप्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रमच दिला आहे.