डोंबिवलीतील 'कबड्डीचा' श्वास हरपला, रमेश देवाडीकर यांचं निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 15:39 IST2017-07-29T14:27:44+5:302017-07-29T15:39:50+5:30
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी सरचिटणीस रमेश देवजी देवाडीकर यांचे निधन झाले आहे. शनिवारी ( 29 जुलै ) सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

डोंबिवलीतील 'कबड्डीचा' श्वास हरपला, रमेश देवाडीकर यांचं निधन
मुंबई, दि. 29 - महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी सरचिटणीस रमेश देवजी देवाडीकर यांचे निधन झाले आहे. शनिवारी ( 29 जुलै ) सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवाडीकर यांनी आपले सर्व आयुष्य कबड्डीला वाहून घेतले होते. ते अविवाहित होते. छत्रपती मंडळ डोंबिवली या संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी बरेच वर्ष ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले.
कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांच्या निधनानंतर प्रभारी सरचिटणीस म्हणून कार्यभार सांभाळला. त्यानंतर या जागेवर देवाडीकर निवडून आले. त्यांच्या निधनाने मैदानावरील कार्यकर्ता हरपला आहे. देवाडीकर यांची अंत्ययात्रा शनिवारी दुपारी 4 वाजता रेती बंदर (डोंबिवली पश्चिम) येथील त्यांच्या निवासस्थानाहून काढण्यात येणार आहे.