रामदेवबाबा स्वदेशी संस्कृतीचे ‘अॅम्बेसेडर’
By Admin | Updated: September 5, 2016 19:26 IST2016-09-05T19:26:25+5:302016-09-05T19:26:25+5:30
योगगुरु रामदेवबाबा यांच्या प्रयत्नांमुळे जगभरात आयुर्वेदाचा प्रचार होत आहे. आपल्या देशातून ७० हजार कोटींची ‘रॉयल्टी’ बाहेरील देशात जाते.

रामदेवबाबा स्वदेशी संस्कृतीचे ‘अॅम्बेसेडर’
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ५- योगगुरु रामदेवबाबा यांच्या प्रयत्नांमुळे जगभरात आयुर्वेदाचा प्रचार होत आहे. आपल्या देशातून ७० हजार कोटींची ‘रॉयल्टी’ बाहेरील देशात जाते. परंतु रामदेवबाबांमुळे परकीय चलन देशात येईल. ख-या अर्थाने ते स्वदेशी व आयुर्वेदिक संस्कृतीचे ‘अॅम्बेसेडर’ आहेत, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. सोमवारी गडकरी यांच्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
१० सप्टेंबर रोजी नागपूरच्या मिहान प्रकल्पात रामदेवबाबा यांच्या पतंजली समूहाच्या ‘फूड पार्क’चे भुमिपूजन होणार आहे. राज्यातील ८० टक्के वनजमीन विदर्भात आहे. जंगलांमध्ये आयुर्वेदिक औषधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. रामदेवबाबा यांच्या पुढाकारातून आदिवासींना वनौषधी विकून रोजगार मिळेल व यापासून आयुर्वेदिक औषधांचे निर्माण होईल. यातून कमीतकमी २० हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
रामदेवबाबा फळांच्या रसांवर प्रक्रिया करणारा प्रकल्पदेखील सुरू करणार आहेत. यामुळे विदर्भातील शेतकºयांना मोठा आधार मिळेल व आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल. या क्षेत्रातून नफा कमावण्याचा रामदेवबाबा यांचा कुठलाही नाही. त्यामुळेच ते खºया अर्थाने स्वदेशी व आयुर्वेदिक संस्कृतीचे ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ असल्याचे गडकरी म्हणाले.