खंडणी प्रकरणी रामदास कदम यांच्या टायपिस्टला अटक

By Admin | Updated: May 7, 2017 10:31 IST2017-05-07T09:28:21+5:302017-05-07T10:31:10+5:30

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्याकडे टायपिस्ट म्हणून काम करणाऱ्या महेश सावंत यांना वाळू ठेकेदाराला धमकावून खंडणी मागितल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Ramdas Kadam's Typist arrested in connection with the extortion case | खंडणी प्रकरणी रामदास कदम यांच्या टायपिस्टला अटक

खंडणी प्रकरणी रामदास कदम यांच्या टायपिस्टला अटक

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्याकडे टायपिस्ट म्हणून काम करणाऱ्या महेश सावंत यांना वाळू ठेकेदाराला धमकावून खंडणी मागितल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. वाळू ठेकेदाराकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. विशेष म्हणजे रामदास कदम यांनीच महेश सावंत यांना मुंबईच्या मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात दिलं. 
 
गुरुवारी महेश सावंतांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. अखेर शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आली.  रामदास कदम यांच्या नावाचा गैरवापर करुन विदर्भातील एका व्यावसायिकाला कारवाई टाळण्यासाठी खंडणी देण्याची मागणी सावंतांनी केल्याचं सांगितलं जात आहे. विदर्भातील एका वाळू ठेकेदाराला महेश सावंत सातत्यानं फोन करत होता. दहा लाख रुपये द्या, अन्यथा मंत्र्यांशी बोलून तुमच्यावर कारवाई करू, अशी धमकी त्यानं दिली होती. 
 
महेश सावंत यांनी खंडणी मागितल्याची माहिती शिवसेना विभाग प्रमुखांनी रामदास कदम यांना दिली होती. त्यानंतर फोन टॅप करुन कदम यांनी याविषयी माहिती मिळवली आणि सावंत यांना मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात दिलं. 

Web Title: Ramdas Kadam's Typist arrested in connection with the extortion case