शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

काका, काका म्हणायचे अन् माझेच खाते घेऊन बसले; कदमांचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 11:15 IST

पक्ष फुटतोय तरी तुम्हाला शरद पवार का हवेत? हा हट्ट कुणाचा आहे? तुमच्या बाजूला पक्षद्रोही आहेत ते ओळखा असं रामदास कदम यांनी सांगितले.

मुंबई - किती लोकांची तुम्ही हकालपट्टी करणार आहात? इतरांची हकालपट्टी करण्यापेक्षा तुमच्या आजूबाजूला शिवसैनिक आहेत की पवारांची माणसं ते पाहा. आमदारांना शिवीगाळ, आक्रमक भाषा वापरली गेली. राष्ट्रवादी सोडावी इतकीच मागणी आमदारांची होती, बंडखोर आमदारांची येण्याची तयारी होती पण उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही अशी खंत शिवसेनेतून हकालपट्टी केलेले नेते रामदास कदम यांनी व्यक्त केली. 

रामदास कदम म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांना संपवून १०० आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. ५१ आमदारांनी हे पाऊल उचललं नसतं तर पुढील निवडणुकीत शिवसेनेचे १० आमदारही निवडून आले नसते. महाराष्ट्राचा खजिना अजित पवारांनी राष्ट्रवादीसाठी लुटला. प्रशासकीय अनुभव नसल्याने उद्धव ठाकरेंना फसवलं. पक्ष फुटतोय तरी तुम्हाला शरद पवार का हवेत? हा हट्ट कुणाचा आहे? तुमच्या बाजूला पक्षद्रोही आहेत ते ओळखा. बेईमानी आमच्या रक्तात नाही. आम्हाला शिवसेना वाचवायची आहे असं त्यांनी सांगितले.  

आदित्यला साहेब म्हणावं लागतं ही खंतत्याचसोबत मला आदित्य साहेब म्हणावं लागतं. माझं वय ७० आहे. कारण ते ठाकरे आहेत. मातोश्रीतले आहेत. आदित्य ठाकरेंनी संयम पाळायला हवा होता. जे जे आमदार गेले त्यांनी पक्षासाठी योगदान दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी दिले नाही माणूस कर्तृत्वाने मोठा होता. पक्षासोबत माणसांचेही योगदान आहे. मंत्री बनवला म्हणजे भीक दिली असं नाही हे उद्धव ठाकरेंनी समजू नये असंही रामदास कदम म्हणाले. 

तसेच दीड वर्ष आदित्य ठाकरे मी पर्यावरण मंत्री असताना माझ्या कॅबिनमध्ये येऊन बसायचे. मला म्हणायचे भाई या अधिकाऱ्यांना बोलावा, सचिवांना बोलवा, बैठक लावा. बाहेरच्या माणसांना बसवून मंत्रालयात अधिकृत बैठका घेत येत नाही. तरीही मी उद्धव ठाकरेंचे चिरंजीव म्हणून बैठका लावल्या. प्लास्टिक बंदी मी केली आणि श्रेय आदित्यला मिळाले. काका काका म्हणणारे माझेच खाते घेऊन बसणार आहेत हे मला माहित नव्हतं. इतके राजकारण आम्ही घरात कुटुंबात केले नाही असा घणाघात रामदास कदमांनी आदित्य ठाकरेंना लगावला. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRamdas Kadamरामदास कदमAaditya Thackerayआदित्य ठाकरे