शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Ramdas Kadam: "रामदासभाई, तुम्हाला निवृत्त होता येणार नाही; आता सेकंड इनिंगची जोरदार सुरुवात करा"- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 10:03 IST

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी रामदास कदमांना पक्षात सक्रिय होण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे कदमांचे पुनर्वसन होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

रत्नागिरी: शिवसेनेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा गेल्या काही महिन्यांपासून पक्षासोबत दुरावा निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Tahckeray) यांच्या नाराजीमुळे रामदास कदम पक्षाच्या कुठल्याच कार्यक्रमात दिसत नाहीत. पण, आता कदमांचे पुनर्वसन होण्याचे संकेत मिळाले आहेत. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

'तुम्हाला निवृत्त होता येणार नाही'

रामदास कदम यांनी लिहलेल्या 'जागर कदम वंशाचा' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. यावळी शिदेंनी कदमांना पक्षात सक्रिय होण्याचे आवाहन केले आहे. "रामदासभाई तुम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे फायरब्रँड नेते आहेत. तुम्हाला निवृत्त होता येणार नाही. आपली चांगली टीम आहे, समाजाला आपली गरज आहे. पक्षासाठी आणि समाजाच्या हितासाठी आपण स्वतःला झोकून देत काम केले आहे.''

'सेकंड इनिंगची तयारी करा'

''आपले पुत्र आमदार योगेश कदम मतदारसंघात चांगलं काम करत आहेत. त्यांना जिथे जिथे निधी लागेल तिथे निधी देण्यासाठी आपण कमी पडणार नाही. भाई आपण केवळ पुस्तके लिहण्याचा विचार करू नका. आता आपल्याला प्रवाहामध्ये राहायचं आहे. आता आपण आपल्या सेकंड इनिंगची जोरदार सुरुवात करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत", असे मोठे विधान एकनाथ शिंदे यांनी केले आहे.  त्यांच्या या वक्तव्यामुळे रामदास कदम यांचे पुनर्वसन होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सभेसाठी रामदास कदमांना निमंत्रण, पण जाणार नाहीतशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 14 मे रोजी मुंबईतील बीकेसी मैदानावर सभा होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे मनसे आणि भाजपकडून होत असलेल्या राजकीय हल्ल्यांना प्रत्युत्तर देणार आहेत. या सभेसाठी रामदास कदम यांना उद्धव ठाकरेंकडून निमंत्रण मिळाले आहे. रामदास कदम यांनी स्वतः उद्धव ठाकरेंचा निरोप मिळाल्याचे सांगितले. पण, कदम सभेसाठी जाणार नाहीत. ते सभेनंतर उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याचे कदमांनी सष्ट केले. 

उद्धव ठाकरेंच्या नाराजीचे कारण काय ?परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित एका ऑडिओ क्लिपमुळे कदम यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाराज झाल्याचे सांगितले जात होते. रामदास कदम यांनी किरीट सोमय्या यांना अनिल परब यांच्याविरोधात पुरावे दिल्याची चर्चा होती. मात्र, रामदास कदम यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना