शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

हातपाय हलत नव्हते ही उद्धव ठाकरेंची नौटंकी, हॉस्पिटलमध्ये असताना..; कदमांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 14:28 IST

शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी प्रतारणा करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले. गद्दार तुम्ही आहात असा घणाघात रामदास कदमांनी केला.

मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठित खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले. ५१ आमदार गद्दार कसे होतात. गद्दार तर तुम्ही आहात. हॉस्पिटलला होतो, हात-पाय हलत नव्हते हे सगळं नाटक आहे. उद्धव ठाकरेंची नौटंकी आहे. मी मातोश्रीची नसनस ओळखतो. उद्धव ठाकरे काय आहेत, रश्मी ठाकरे काय आहेत, आदित्य काय आहेत हे मला माहिती आहे अशा शब्दात शिंदे गटाचे शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. 

रामदास कदम म्हणाले की, आम्ही उभा केलेला पक्ष पत्त्यासारखं कोसळतोय डोळ्यसमोर बघतोय. उद्धव ठाकरेंना सगळं आयतं मिळालं. त्यांचे योगदान काही नाही. आम्ही ५२ वर्ष सगळं भोगलंय. आमच्यासाठी सुपाऱ्या दिल्यात. जे शिवसेनाप्रमुख अख्ख आयुष्य काँग्रेस-राष्ट्रवादीशी लढले आणि हिंदुत्व वाढवलं. त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून मुख्यमंत्रिपद घेतले. उद्धव ठाकरे कधीही कुणाचं ऐकत नाही. त्यांना खूप कमी लोकांनी ओळखलं आहे. मी बरोबर ओळखून आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी पुरस्कृत उद्धव ठाकरेंची शिवसेना यात जमीन आस्मानचा फरक आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना नेत्यांची किंमत शून्य झाली. उद्धव ठाकरे हुकुमशहा झाले. बाळासाहेब ठाकरे साधे होते असं बोलतात पण ते हुशार होते. शिवसेना मागे जाण्यात उद्धव ठाकरेच जबाबदार आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी प्रतारणा करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले. गद्दार तुम्ही आहात. माणूस बुडतो तेव्हा हातपाय हलवतो. या आमदारांनी निर्णय घेतला नसता तर पुढच्या विधानसभेत एकही आमदार निवडून आला नसता. कारण राष्टवादीने अडीच वर्षात पराभूत आमदारांना ताकद देण्याचं काम केले असा आरोप रामदास कदम यांनी केला. 

दरम्यान, ५-१० तास आमदार, खासदारांना वर्षा बाहेर उभं करायचे. कुणाला भेट द्यायची नाही. आता तुम्ही लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी खोटं सांगताय. तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना रामदास कदम आणि त्याच्या मुलाला संपवण्याचं कटकारस्थान तुमचं सुरू होते. त्यावेळी बैठकीत सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, उदय सामंत होते. योगेशला संपवून टाका. कदम कुटुंब संपवायचं आहे असे हॉस्पिटलला दाखल असताना आदेश देत होते. उदय सामंत त्या बैठकीत होते आणि ते सगळे आता बाहेर आले. सहानुभूती मिळवण्यासाठी मी बेशुद्ध होते वैगेरे नाटकं करत आहेत. पालापाचोळा तुम्ही झालात असा टोला रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

बाळासाहेब जिवंत असते तर...महाराष्ट्रात कुणालाही विचारा, शिवसेनाप्रमुख जिवंत असते तर उद्धव ठाकरेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन मुख्यमंत्री बनवलं असतं का? रस्त्यावर आलात? संघर्ष केलात? तुमच्या अंगावर किती केसेस आहेत? आम्ही जेल भोगलीय. संघर्ष केलाय. बाळासाहेबांचा मुलगा त्याव्यतिरिक्त तुमचं शिवसेनेसाठी योगदान काय? असा सवाल रामदास कदमांनी विचारला आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRamdas Kadamरामदास कदमBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना