शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

Ramdas Athawale Interview: फडणवीसांनी मातोश्रीवर जावे, उद्धव ठाकरेंशी जुळवून घ्यावे; रामदास आठवलेंचा दोघांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 12:02 PM

Ramdas Athawale's Advice to Devendra Fadanvis, Uddhav Thackeray: राज्यातील राजकारणावर बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांना काही सल्ले दिले. तसेच आपल्याला आरपीआय स्वत:च्या हिंमतीवर आमदार, खासदार निवडून येतील असा उभारता आला नाही. यामुळे अनेकांना न्याय देता आला नाही, असे सांगत कार्यकर्त्यांची माफीदेखील मागितली आहे. 

मुंबई: उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांची तशी इच्छा नव्हती. भाजपा आणि शिवसेनेत सत्तेतील अडीज-अडीज वर्षांचा वाटा ठरला होता, परंतू त्यांच्यात एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे जे व्हायला नको होते, ते झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेत आली. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत. मित्र म्हणून अत्यंत साधाभोळा माणूस आहे, अशी स्तुतीसुमने केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर उधळली. परंतू त्यांनी एक सल्लाही दिला. (Ramdas Athawale gave suggestion to Uddhav Thackeray, Devendra Fadanvis, Sharad Pawar)

Ramdas Athawale Interview: मोदींना हसविणे सोपे नव्हते, ते केले; रामदास आठवलेंनी सांगितले भाजपाकडे कसा वळलो...

लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी रामदास आठवले यांची राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक मुलाखत घेतली. यावेळी रामदास आठवलेंनी आईच्या आठवणी सांगितल्या. राज्यातील राजकारणावर बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांना काही सल्ले दिले. तसेच आपल्याला आरपीआय स्वत:च्या हिंमतीवर आमदार, खासदार निवडून येतील असा उभारता आला नाही. यामुळे अनेकांना न्याय देता आला नाही, असे सांगत कार्यकर्त्यांची माफीदेखील मागितली आहे. 

ज्या समाजासाठी मी लढलो, त्याच आपल्या लोकांनी माझ्यावर ठिकठिकाणी हल्ले केले. याचे मला आयुष्यभर वाईट वाटत राहील असे आठवलेंनी सांगितले. याचबरोबर उद्धव ठाकरेंना सल्ला देताना त्यांनी महायुतीत यावे, आणि फडणवीसांचे गीत गावे. फडणवीसांनी एक दिवस मातोश्रीवर जावे, आणि उद्धवजींना घेऊन यावे, अशी कविता केली. गो कोरोनासारखी माझी हाक 'कम उद्धवजी' अशी असेल, असेही त्यांनी सांगितले. तसेच देवेंद्र फडणवीसांना सल्ला देताना उद्धव ठाकरेंसोबत जुळवून घ्यावे, 2.5 वर्षे त्यांना द्यावे, अडीज आपण घ्यावे, असा सल्ला दिला. 

शरद पवारांनी एनडीएत यावे...शरद पवारांना सल्ला देताना आठवले यांनी, शरद पवार आहेत माझे चांगले मित्र, समतेचे आहे त्यांच्यात चित्र. गोविंदरावांचे आहेत ते पूत्र, पवारांना मी देतो शुभेच्छा, त्यांनी एनडीएत यावे ही इच्छा, अशी मागणी कवितेद्वारे केली. लव्ह मॅरेज...पत्नी ब्राम्हण समाजाची आहे. सांगलीत राहत होती. मध्य प्रदेशमधील कुटुंब. लव्ह मॅरेज नाही. परंतू तिने मला आणि मला तिने पाहिले होते. एकमेकांच्या मनात भरले होते. यामुळे आम्ही लग्न केले. तिच्या घरचे नातेवाईक माझ्या घरी येतात, आम्ही त्यांच्या घरी जातो, असे सांगितले. जेव्हा माझ्या सोबत आली माझी बायको सीमा, तेव्हा मी लागलो होतो माझ्या कामा...अशी शीघ्र कविता देखील त्यांनी केली.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवार