शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदे रडले, म्हणून उद्धव ठाकरे तोंडावर पडले; ऐका रामदास आठवले काय म्हटले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 15:51 IST

कनाथ शिंदे मजबूत माणूस आहे. तो रडणारा माणूस नाही असं आठवले म्हणाले.

मुंबई - अटकेच्या भीतीने एकनाथ शिंदे मातोश्रीत येऊन रडले असा दावा आदित्य ठाकरेंनी एका मुलाखतीत केला. त्यावरून शिंदे समर्थकांनीही आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. त्यात युतीचा घटक पक्ष असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनीही त्यांच्या अनोख्या शैलीत ठाकरेंचा समाचार घेतला आहे. एकनाथ शिंदे रडले म्हणून उद्धव ठाकरे तोंडावर पडले अशी चारोळी आठवलेंनी म्हणत या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. 

रामदास आठवले म्हणाले की, आदित्य ठाकरे, म्हणतात, एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले, म्हणूनच उद्धव ठाकरे तोंडावर पडले, रडण्याचा विषय नाही. एकनाथ शिंदे मजबूत माणूस आहे. तो रडणारा माणूस नाही. तो खरा शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरेंचा अनुयायी आहे. रडणारे काम त्यांच्याकडून होईल असं वाटत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे रडले असा आरोप करणे अत्यंत चुकीचा आहे. एकतर भाजपाला सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत त्यांनी आघाडी केली म्हणून शिंदेंनी बंड केले असं त्यांनी सांगितले. 

अजित पवारांना दिली ऑफरराज्यात अजित पवारांबद्दल ज्याकाही चर्चा सुरू आहेत. त्यावरून रामदास आठवलेंना पत्रकारांनी प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले की, अजित पवार भाजपात जातील असं वाटत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचे संबंध चांगले आहेत. मुख्यमंत्री माझ्या पक्षाचा होणार नाही. कारण तेवढे आमदार नाहीत. पण राजकारणात काही होऊ शकते. आमच्या पक्षाला मुख्यमंत्रिपद दिले तर फार मोठी गोष्ट आहे. आम्ही अजित पवारांना मुख्यमंत्रिपद देऊ अशी ऑफरच रामदास आठवलेंनी दिली आहे. 

शिवसेनेचा ठाकरेंवर पलटवारआदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटानंतर शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जोरदार पलटवार केला आहे. म्हस्के म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री हे कष्टकरी, शेतकरी यांचे अश्रू पुसणारे आहेत. घरात मासा मेला म्हणून दारे बंद करून रडणारे नाहीत. आम्ही रडणारे नसून रडवणारे आहोत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. तेव्हा सगळ्या नेत्यांना बाजूला ठेऊन पंतप्रधान मोदींची वेगळी भेट उद्धव ठाकरेंनी घेतली होती. तेव्हा ते रडत होते कारण नोटीस यांना आली होती. त्यावेळी नरेंद्र मोदींकडे ही मंडळी गयावया करत होती. आम्हाला कशाला नोटीस येईल? आपली, आपल्या नातेवाईकांची, मित्रांची परदेशात कुठे कुठे कंपन्या आहेत त्याचा सगळा चिठ्ठा आमच्याकडे आहे, त्या उघड कराव्या लागतील असा इशारा त्यांनी दिला. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवार