रामदास आठवले यांचा कोपर्डी दौरा स्थगित

By Admin | Updated: July 23, 2016 10:44 IST2016-07-23T10:42:42+5:302016-07-23T10:44:59+5:30

कोपर्डीतील अत्याचारग्रस्त मुलीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी निघालेल्या रामदास आठवलेंनी हा दौरा स्थगित केला.

Ramdas Athavale postponement of Kopardi visit | रामदास आठवले यांचा कोपर्डी दौरा स्थगित

रामदास आठवले यांचा कोपर्डी दौरा स्थगित

>ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. २३ -  नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घनटेमुळे संपूर्ण राज्य तापलेले आहे. त्या पीडित मुलीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मंत्री व रिपाइंचे नेते रामदास आठवले आज कोपर्डीत निघाले होते, मात्र मुख्यमंत्र्यांच्या दुरध्वनीनंतर त्यांनी हा दौरा स्थगित केला आहे. 
सुरक्षेच्या कारणास्तव तुम्ही आत्ता तेथे जाणे योग्य ठरणार नाही, हे प्रकरण आणखीन चिघळेल व विरोधकांच्या हाती कोलीत मिळेल. त्यामुळे तुम्ही आत्ता कोपर्डी येथे जाऊ नका, काही दिवसांनी आपण एकत्र तेथे जाऊ, असा निरोप मुख्यमंत्र्यांनी आठवले यांना पाठवला. मुख्यमंत्र्यांचा निरोप मिळताच आठवले मुंबई विमानतळावरून परत फिरले. 

Web Title: Ramdas Athavale postponement of Kopardi visit