अमेरिकेतील आंबेडकर जयंतीसाठी स्वत: जाणार - रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 06:31 IST2018-03-26T06:31:58+5:302018-03-26T06:31:58+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती युनोच्या जनरल असेंम्बली हॉलमध्ये साजरी करण्यासाठी, केंद्र सरकारतर्फे युद्धपातळीवर प्रयत्न केले जातील.

Ramdas Athavale going to himself for Ambedkar Jayanti in America - Ramdas Athavale | अमेरिकेतील आंबेडकर जयंतीसाठी स्वत: जाणार - रामदास आठवले

अमेरिकेतील आंबेडकर जयंतीसाठी स्वत: जाणार - रामदास आठवले

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती युनोच्या जनरल असेंम्बली हॉलमध्ये साजरी करण्यासाठी, केंद्र सरकारतर्फे युद्धपातळीवर प्रयत्न केले जातील. युनोतील भीम जयंतीचा कार्यक्रम रद्द करण्याबाबत भारतीय नोडल एजन्सीने पत्र दिल्याचा आरोप होत आहे. याबाबत वस्तुस्थितीची माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाईल, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
शिवाय अमेरिकेतील विविध शहरांत आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण स्वत: अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.
अ‍ॅट्रॉसिटीच्या गैरवापराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार आहे, असेही आठवले यांनी सांगितले.

Web Title: Ramdas Athavale going to himself for Ambedkar Jayanti in America - Ramdas Athavale