मेहनत, कष्टामुळे राम शिंदेंना बढती मिळाली - भामा शिंदे
By Admin | Updated: July 8, 2016 18:08 IST2016-07-08T16:45:44+5:302016-07-08T18:08:29+5:30
आज झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारात गृहराज्यमंत्री राम शिंदे यांना बढती मिळाली.

मेहनत, कष्टामुळे राम शिंदेंना बढती मिळाली - भामा शिंदे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - आज झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारात गृहराज्यमंत्री राम शिंदे यांना बढती मिळाली. त्यांना गृहराज्यमंत्रिपदावरुन कॅबिनेटमंत्रीपदी बढती मिळाली. कर्जत जामखेडचे आमदार असणारे राम शिंदे यांची २०१४ मध्ये सरकार स्थापनेच्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहराज्यमंत्रीपदी नियुक्ती केली होती.
मुलाची कॅबिनेटमंत्रीपदी बढती झाल्याने राम शिंदे यांच्या मातोश्री भामा शिंदे यांना गहिवरुन आले होते. त्यांना या विषयी विचारले असता मला आनंद झाला. कष्ट, मेहनतीमुळे राम शिंदे यांना बढती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या मुलाविषयी बोलत असताना या मातेला गहिवरुन आले होते.